करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील हे विजयाच्या उंबरड्यावर आहेत. त्यांनी भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मागे टाकले आहे. काही वेळातच येथील निकाल हाती येणार आहे.

मोहिते पाटील म्हणाले, मतदारांनी मला निवडणुकीत उतरवले होते. त्यांनीच ही निवडणूक हातात घेतली होती. देशात नागरिकांना बदल हवा होता आणि तो बदल होण्याचे चिन्ह आहे. या या निवडणुकीत आम्ही पाण्याचे योग्य नियोजन, रेल्वे, एमआयडीसी यासह निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करणार आहे, असे मोहिते पाटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *