25 lakh funds sanctioned for various development works in Washimbe25 lakh funds sanctioned for various development works in Washimbe

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वाशिंबे येथे २०२३- २४ अर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुलभूत सुविधा २५१५ योजनेअंतर्गत आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने शरदचंद्रजी पवार विद्यालय ते रामचंद्र पाटील वस्ती रस्ता खडीकरण करणे यासाठी पाच लाख, रेल्वे नाला ते भैरवनाथ मंदीर रस्ता पाच लाख रुपये, रेल्वे लाईन ते संजय गायकवाड वस्ती पाच लाख रुपये, मुस्लिम बांधव समाज मंदीर 10 लाख रुपये अशा 25 लाख रुपये निधी मंजूर झाला असुन येत्या दोन महिन्यात प्रत्यक्ष या कामास सुरुवात होईल, अशी माहिती वाशिंबे ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी झोळ यांनी दिली.

सरपंच झोळ म्हणाले, आमदार शिंदे यांच्याकडे राजुरीचढ फोडने, वाशिंबे ते चौफूला ते गोविंदपर्व कारखाना डांबरीकरण, टाकळी ते डिकसळ पूल रस्ता रुंदीकरण, जिंती चौक ते कात्रज ते कात्रज रेल्वे स्थानक रस्ता मुख्यमंत्री सडक योजनेत समाविष्ट करणे, पोमलवाडी ते केतूर- पारेवाडी- सावडी फाटा डांबरीकरण, राजुरी ते पोंधवडी रस्ता डांबरीकरण यासह परिसरातील विविध विकास कामांसाठी पाठपुरावा सुरू आहे.

यासाठी भरघोस निधीची तरतूद करण्यात येणार असून लवकरच सकारात्मक व ठोस निर्णय समोर येतील. वाशिंबेसह इतर गावातील नळ पाणीपुरवठा योजनेचे काम प्रगती पथावर सुरू आहे. लवकरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होतील. या योजनेमुळे गावातील सिमेंट काँक्रीट रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. दुरुस्तीची कामे ही हाती घेतली जाणार आहेत. २५ लाख रुपये निधी मंजूर केल्याबद्दल आमदार शिंदे यांचे वाशिंबे ग्रामपंचायतीच्या वतीने आभार मानले जात आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *