करमाळा (सोलापूर) : कुकडी उजनी उपसा सिंचन योजनेसाठी सर्वेक्षणाला सरकारकडून आदेश येताच वीटमध्ये आमदार संजयमामा शिंदे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. आमदार शिंदे यांनी २०२२ पासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी फटाके फोडून, पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
या योजनेमुळे तालुक्यातील ४० गावांना पाणी मिळणार आहे. यावेळी माजी सरपंच उदय ढेरे, सरपंच महेश गणगे, बाळासाहेब ढेरे, सदस्य बबलू गणगे, चंद्रकांत ढेरे, मिनीनाथ चोपडे, गोरख ढेरे, महादेव जाधव, हेमंत आवटे, अंकुश जगदाळे, दिगंबर चोपडे, अनिल चोपडे, औदुंबर जाधव, सुभाष गाडे, नानासाहेब ढेरे, डॉ. अरुण जाधव, अशोक ढेरे, सचिन गाडे, दादासाहेब जाधव पाटील, तुषार ढेरे, मचिंद्रनाथ जाधव, संदीप ढेरे, भाऊसाहेब गायकवाड, सुभाष आवटे, मारुती गाडे, बालाजी आवटे, भाऊसाहेब गाडे, श्रीकांत ढेरे, विशाल गाडे, काकासाहेब चोपडे, दीपक गाडे, एकनाथ जाधव, गणेश शिंदे, गणपत ढेरे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या योजनेचे जनक आमदार संजयमामा शिंदे यांच्या या मागणीवर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित पवार यांनी दिले आहेत. जलसंपदाचे सचिव डॉ. अरुण बेलसरे व महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांना सर्वेक्षणासाठी त्वरित निधी उपलब्ध करून देण्याचे आदेशही यावेळी दिले आहेत. जलसंपदा विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसह रामराजे निंबाळकर, आमदार बबनदादा शिंदे, आमदार संजयमामा शिंदे, आमदार दीपक चव्हाण आदी उपस्थित होते.