NCP Nationalist split Ajit Pawar joins Shinde-Fadnavis governmentNCP Nationalist split Ajit Pawar joins Shinde-Fadnavis government

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीत फूट पडली असून विरोधी पक्षनेते अजितदादा पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील होणार आहेत. पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून राष्ट्रवादीचे नऊजण मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत, अशी माहिती मिळत आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना व भाजपच्या युतीत राष्ट्रवादीचे पवार हे सामील झाले आहेत. पवार हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे ३० ते ४० आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा राजभवनाकडे निघाले आहेत.

पवार आपला एक गट घेऊन महायुतीला मिळाले आहेत. शिवसेनेनंतर महाराष्ट्रात राष्ट्रवादीत मोठी फूट पडली आहे. अजित पवार यांनी पक्षात दुसऱ्यांदा बंड केलं आहे. पवार यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादीतील अनेक बड्या आमदारांची बैठक सुरु होती. तब्बल चार तास ही बैठक सुरू होती. त्यानंतर अजित पवार यांचे पीए राजभवनात दाखल झाले आहे. अजित पवार उपमुख्यंमत्री पदाची शपथ घेवू शकतात. अजित पवार सरकारमध्ये सामील होण्याची जोरदार चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्री पदाची शपथ घेवू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली. राष्ट्रवादीचे 30 आमदार अजित पवार यांच्यासोबत आहेत. या 30 आमदारांच्या सह्यांचे पत्र अजित पवार राज्यपालांना देणार आहेत.

अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित आमदार
दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, किरण लहमाटे, सरोज अहिरे, अशोक पवार, अनिल पाटील, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, दौलत दरोडा, अनुल बेणके, रामराजे निंबाळकर, धनंजय मुंडे, निलेश लंके, मकरंद पाटील आदी उपस्थित आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *