करमाळा (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमीत्त नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर नगरपालिका सेंट्रल स्कूल मुले नं १ येथे बाल दिंडी काढण्यात आली. आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला निघालेल्या या दिंडीत बाल सतांनी सर्वांचे लक्ष वेधले.
मुख्याधिकारी सचिन तपसे, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, लिपीक शिवदास कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही दिंडी काढण्यात आली. माजी नगरसेविका संगिता खाटेर, सामाजिक कार्यकर्ते श्रेणिक खाटेर, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. वर्षा करंजकर यांच्यासह पालक उपस्थितीत होते.
टाळाच्या गजरात बालवारकरी हातात पताका घेऊन ज्ञानोबा तुकोबाचा जयघोष करत होते. सर्वांत पुढे बॅन्डपथक, घोडेस्वार, झेंडेकरी व वारकरी रथावर स्वार झाले होते. विठ्ठल रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव, संत मुक्ताबाई, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ, संत गोरा कुंभार, संत संत रामदास स्वामी चांगदेव, संत जनाबाई, संत मुक्ताबाई दिंडी प्रमुख मृदंग वादक वासुदेव पोलिस भालदार, चोपदार घोडेस्वार अशा वेगवेगळ्या वेशात विद्यार्थी सहभागी झाले होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका सुनंदा जाधव, उपशिक्षक सुरेश कोळी, लालासाहेब शेरे, सुनिता भैलुमे, सुनिता उबाळे, धनश्री उपळेकर, सुषमा उबाळे, मंगल गलांडे, आशा अभंगराव, वैशाली जगताप, आश्विनी ठाकरे, सुरेखा कांबळे, गौरव पलिकोडवार, मुलींची शाळा नंबर २ चे मुख्याध्यापक बलभीम शिंदे, उपशिक्षिका प्रज्ञा जोशी, लता उबाळे, सुनिल जाधव यांनी बालदिंडी यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.