करमाळा (सोलापूर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा मंगळवारी (ता. 13) करमाळा येथे येणार आहे. या यात्रेनिमित्त अथर्व मंगल कार्यालय येथे दुपारी २ वाजता सभा होणार आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार नारायण पाटील यांनी केले आहे.
माजी आमदार पाटील म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने शिवनेरीयेथून शिवस्वराज्य यात्रा काढली आहे. ही यात्रा करमाळा तालुक्यात मंगळवारी येत आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, धैर्यशील मोहिते पाटील, डॉ. अमोल कोल्हे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी, महिला, युवाक यांच्या विरोधातील असलेल्या सरकारच्या धोरणाबाबत यावेळी मांडणी करण्यात येणार आहे. यामुळे शिवस्वाराज्य यात्रेच्या निमित्ताने करमाळा मतदार संघातील प्रलंबीत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि शिवस्वराज्य यात्रेला पाठींबा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी तसेच सुजाण नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणे गरजेचे आहे.