Saluting the Martyred Soldiers during the Varakute Sade Salse Revenue Week the officers gave hoe certificates

करमाळा (सोलापूर) : ‘महसूल सप्ताह’मध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत करमाळा तालुक्यात वरकुटे, साडे व सालसे येथे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी भेट दिली आहे. वरकुटे येथील हुतात्मा जवान नवनाथ गात यांच्या स्मारकास त्यांनी अभिवादन केले.

महसूल विभागामार्फत महसूल सप्ताह सुरु आहे. यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम घेतले जात आहेत. त्यामध्ये ‘सैनिक हो तुमच्यासाठी’ या अभियानांतर्गत घुटुकडे यांच्यासह प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी तालुक्यातील हुतात्मा माता यांचा सन्मान केला. हुतात्मा जवानांच्या कुटुंबाच्या अडीअडचणीबाबत चर्चा करून त्यांना सातबारा, आठ अ व फेरफार उतारे घरपोच दिले. यावेळी मंडळाधिकारी खराव, तलाठी पाटील, अव्वल कारकून सादिक काझी उपस्थित होते.

सालसे येथील हुतात्मा जवान जयहिंद राजाराम पन्हाळकर यांच्या स्मारकास भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांशी चर्चा केली. साडे येथील हुतात्मा जवान हंबीरराव चौधरी यांच्या स्मारकास भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांना सातबारा उतारे व वारस नोंद केल्याचा फेरफार उतारा घरपोच करण्यात आला. हुतात्मा जवान अमोल निलंगे यांच्या स्मारकास भेट देऊन आदरांजली अर्पण करून चर्चा करण्यात आली. यावेळी अमित कलेटवाड, मंडळ अधिकारी बिराजदार, तलाठी सलगर यांच्यासह गावातील नागरिक, सरपंच, पोलिस पाटील व कोतवाल उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *