I am not deceiving citizens by telling them that non-existent works are being done MLA Sanjay Shinde

करमाळा (सोलापूर) : आमदार झाल्यापासून आपण करमाळा तालुक्यात विकासाचे राजकारण केले आहे. एखादे काम होत असेल तर त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करत कामे मार्गी लावली. न होणारी गोष्ट विनाकारण नागरिकांना खोट्या भूलथापा देऊन फसवणूक करणे हे काम केलं नाही, असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

संगोबा व आवाटी येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन व लोकार्पण आमदार शिंदे यांचे हस्ते व माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाला. आमदार शिंदे म्हणाले, २०१९ ते २४ या कार्यकाळात मतदार संघात भूसंपादन, सिंचन, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण, कृषी व प्रशासन या कामासाठी साधारण ३ हजार कोटी निधी आपण उपलब्ध केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, विकास ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. माझ्याकडून एखादे काम व्हायला उशीर झाला असेल परंतु ते पूर्ण करण्याकडेच माझा कल असल्यामुळे असंख्य रखडलेले प्रकल्प मी मार्गी लावू शकलो. त्यामध्ये नव्याने सब स्टेशनची निर्मिती, सबस्टेशनची क्षमतावाढ किंवा टेंभुर्णी- जातेगाव रस्ता, कुकडी प्रकल्प क्षेत्रातील गावांना पाणी देण्याचा विषय, डिकसळ पूल, हॅमअंतर्गत 71 किलोमीटरचा रस्ता ही विकास कामे मंजूर केल्याचे समाधान आहे.

यावेळी वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, विलास पाटील, चंद्रहास निमगीरे, उध्दव माळी, सुनील सावंत, ऍड. राहुल सावंत, कंदरचे सरपंच मौला मुलाणी, अशोक पाटील, ऍड. रविंद्र विघ्ने, उपसरपंच अमर भांगे, अजिंक्य पाटील, किरण फुंदे, गोरख गुळवे, विनय ननवरे, गौतम ढाणे, चंद्रकांत सरडे, भरत अवताडे, राजेंद्र बाबर, दादासाहेब सावंत, मानसिंग खंडागळे, अशोक पाटील, अशपाक जमादार, अभिषेक आव्हाड, शहाजी झिंजाडे, युवराज गपाट, दत्तात्रय अडसूळ, राजेंद्र धांडे, तात्या पाटील, राजेंद्र पवार, सुहास रोकडे, सतीश शेळके, मयूर रोकडे, बापू तांबे, बबनराव मुरुमकर, आशिष गायकवाड, सुजित बागल, परमेश्वर भोगल, नानासाहेब मोरे, पोपट सरडे, संतोष गायकवाड, भोजराज सुरवसे आदी उपस्थित होते.

या कामांचे भूमीपूजन
करमाळा- बोरगाव- घारगाव ते जिल्हा हद्द रस्ता, बोरगाव ते निलज रस्ता, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना रामा 68 ते सटवाई वस्ती- निलज ते बिटरगाव श्री रस्ता, संगोबा घाट, आवाटी दर्गा वॉल कंपाऊंड, गौंडरे फाटा ते नेरले रस्ता, फिसरे- हिसरे- हिवरे ते कोळगाव रस्ता मंजूर कामांचे भूमिपूजन झाले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *