करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका हमाल पंचायत व सावंत गल्लीतील छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाच्या वतीने हमाल पंचायतचे संस्थापक व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाष आण्णा सावंत यांच्या दहाव्या स्मृती दिनानिमित्त बुधवारी (ता. 14) सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत हभप पांडुरंग महाराज उगले यांचे कीर्तन होणार आहे. त्यानंतर सुभाष आण्णा सावंत यांच्या प्रतिमेस पुष्पवृष्टी करून आदरांजली अर्पण केली जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबीर देखील होणार आहे. रक्तदात्यांनी सकाळी 9 ते सायंकाळी 4 या वेळेत याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. हे कार्यक्रम एकदंत मंगल कार्यालयच्या मागे सावंत फार्म हाऊस जामखेड चौक, बायपास रोड येथे होणार आहे.
सुभाष सावंत यांच्या स्मृतिदिनानिमीत्त बुधवारी सावंत फार्महाउस येथे विविध कार्यक्रम
