करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील निंभोरे येथे श्री खंडेश्वर यात्रेनिमित्त हाफपीच टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘सरपंच उपसरपंच चषका’चे उदघाटन श्री खंडेश्वर पंच कमिटीचे प्रमुख हरिकाका वळेकर, घोटीचे सरपंच विलास पाटील, निंभोरे गावचे सरपंच रविंद्र वळेकर, उपसरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायत सदस्य धंनजय वळेकर, दिनेश फरतडे, लालू कळसाईत, दत्ताभाऊ वळेकर, ईश्वर मस्के, महेश जाधव, महेश वाघमारे, महेश पवार, मनोज काळदाते, सुशांत वळेकर, सौरभ जमदाडे, अभिनव जगताप, शरद मोरे, योगेश वाघमारे, जलाल पठाण, अण्णा जगताप, गणेश वळेकर तसेच साडे व घोटीचे संघ, निंभोरे टीम, आयोजक मंडळी उपस्थित होते. सुरुवातीचा सामना घोटी व साडे संघामध्ये झाला. त्या सामान्याचे नाणेफेक सरपंच वळेकर यांचे हस्ते करण्यात आले. या चषकाचा अंतिम सामना रविवारी (ता. 17) होणार आहे.
