करमाळा (सोलापूर) : सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी (शरद पवार गट) महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी भावना गांधी यांची निवड झाली आहे. महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा सुवर्णा शिवपुरे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. जेऊर येथील एका कार्यक्रमात माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते हे पत्र देण्यात आले. यावेळी खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार रोहित पवार, सेवानिवृत्त न्यायाधीश बी. जे. कोळसे पाटील याबरोबरच राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षा नलिनी जाधव, शहराध्यक्षा राजश्री कांबळे, जिल्हा सरचिटणीस विजयमाला चवरे, ॲड. भद्रेश गांधी, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
राष्ट्रवादीला बळकटीसाठी व मजबूत करण्यासाठी पक्षाचे ध्येयधोरणे तळागाळात राबवण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे. शरद पवार यांचे विचार सर्व सामान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही निवड करण्यात आलेली आहे, असे जिल्हाध्यक्ष शिवपुरे यांनी यावेळी सांगितले. यापूर्वी भावना गांधी यांनी शिवसेनेच्या महिला आघाडी शहर प्रमुखपदापासून उपजिल्हाप्रमुखापर्यंत त्यांनी काम केले आहे. त्यांनी भाजपाच्या महाराष्ट्र राज्य महिला मोर्चा राज्य कार्यकारणीच्या सदस्यपदी ही त्यांनी काम केले आहे. दूरसंचार विभागाच्या सल्लागार समितीवरही त्यांनी काम केले आहे. महिला दक्षता समितीवर ही त्या काम पाहत आहेत.