सोलापूर : 2023- 24 या शैक्षणिक वर्षात अनु. जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढीलप्रमाणे नियम व अटी लागू राहतील.
योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विद्यार्थी अनुसुचित जमातीचा असावा. पहिली करीता विद्यार्थ्याचे वय 31 डिसेंबर 2023 पर्यत 6 वर्षे पुर्ण असावे, अनुसुचित जमातीच्या जातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत सादर करावी. विद्यार्थ्याच्या अर्जासोबत पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, जन्मतारखेसाठी ग्रामसेवकाचा दाखला अथवा अंगणवाडीचा दाखला जोडण्यात यावा. विद्यार्थ्याच्या व पालकांच्या आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. विद्यार्थ्यांचा पालक शासकीय अथवा निमशासकीय सेवेत नसावेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी खोटी माहिती सादर केल्यास पाल्यांचा प्रवेश रद्द केला जाईल.
सदर योजनेंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्याला एकदा शाळा निश्चिती झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये पालकांच्या/पाल्यांच्या विनंतीनुसार शाळा बदलता येणार नाही. अनु. जमातीच्या पालकांनी पहिलीच्या प्रवेशाकरीता आपल्या पाल्यांचे अर्ज 30 जुन 2023 प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, सोलापूर यांचेकडे सादर करण्यात यावेत.
तसेच अधिक माहितीसाठी कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. बी. आंधळे, मो. नं. 8369688911 यांचेशी संपर्क साधावा. रु. 1.00 लक्ष वार्षिक उत्पन्न मर्यादा व सक्षम अधिकाऱ्याचे जातीचे प्रमाणपत्र असलेल्या अनु. जमातीच्या इच्छुक जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी या कार्यालयास 30 जुन 2023 पर्यत अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, मनिषा ओव्हाळे यांनी केले आहे.