करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा शहरात आज (शुक्रवारी) सायंकाळी सातव्या दिवशी गजानन स्पोर्ट क्लबसह पाच मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुका निघाल्या. मोठ्या धुमधडाक्यात या मिरवणुका निघाल्या. यावेळी पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोण आवाजाची मर्यादा ओलांडत आहे का यावर पोलिसांची टीम लक्ष ठेऊन होती.

करमाळा शहरातील गजानन स्पोर्ट क्लब, खडकपुराचा राजा, रुपचंद तालीम तरुण मंडळ, मंगळवार पेठ, नंदन प्रतिष्ठाण आदी मंडळांच्या श्री गणेशाचे विसर्जन झाले. यावेळी साकारण्यात आलेले देखावे सर्वांचे लक्ष वेधत होते. गुलालाची उधळण करत या मिरवणुका निघाल्या. काही मंडळांनी डीजे तर काही मंडळांची पारंपरिक वाद्यात मिरवणुका निघाल्या. प्रत्येक चौकात पोलिसांचा बंदोबस्त होता. वेळेत मिरवणुका संपाव्यात म्हणून पोलिस प्रयत्न करत होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *