माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

A case where a teacher assaulted and injured a minor in class

करमाळा (सोलापूर) : ‘माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन’ म्हणत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत करमाळा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

पीडित फिर्यादीने म्हटले आहे की, ‘काही महिन्यापासून गुन्हा दाखल झालेला संशयित आरोपी हा घरासमोरून जात- येत होता. तेव्हा तो तिच्याकडे बगुन हासत व इशारे करत होता. घरी कोण नसेल तेव्हा बोलण्याचा प्रयत्न करत होता. त्याने वडिलांच्या मोबाईलवर फोन करून मला बोलण्याचा प्रयत्न केला होता. तु मला खूप आवडते असे म्हणत फोनवर बोलली नाही तर तुझ्या वडिलांना व भावाला मारिन असे म्हणून तो दम देत होता. ३१ तारखेला सकाळी ८ वाजता आई- वडील शेतात काम करत असताना संशयित आरोपी म्हणाला तू मला खूप आवडते मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. तेव्हा फिर्यादी त्याला म्हणाली की मी अजून लहान आहे मला लग्न करायचे नाही. तेव्हा त्याने फिर्यादीला हाताला धरून जवळ ओढले व वियभंग केला. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून याचा तपास करमाळा पोलिस करत आहेत. करमाळा- टेंभुर्णी रोडवर करमाळ्यापासून साधणार १० किलोमीटरवर असलेल्या गावात हा प्रकार घडला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *