करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ हे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची विचारविनियम बैठक घेतली. या बैठकीत ‘प्रा. रामदास झोळ फाउंडेशनच्या माध्यमातून करमाळा तालुक्यात कार्यरत राहणार’ असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. ‘तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी गावांमध्ये प्रा. रामदास झोळ सर फाउंडेशनच्या माध्यमातून समाजकारण व राजकारण केले जाणार आहे’, असे ते या बैठकीत म्हणाले आहेत.
शेतकरी कामगार संघर्ष समितीचे अध्यक्ष दशरथ कांबळे, हरिभाऊ मंगवडे, गफूर शेख, आनंद झोळ, दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ, संभाजी शिंदे, भगवान डोंबाळे, रवींद्र गोडगे आदी उपस्थित होते.
आमदार मोहिते पाटील यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट
प्रा. झोळ म्हणाले, ‘करमाळा ही आपली जन्मभूमी असून त्याचे ऋण फेडण्यासाठी बारामती, पुणे, इंदापूर प्रमाणे करमाळा तालुक्याचा विकास करण्यासाठी आपण कटीबद्ध आहे. संवैधानिक पदांच्या माध्यमातून तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज तसेच शिक्षण, आरोग्याच्या समस्या सोडवता येत असल्याने विधानसभेची निवडणूक आपण लढवली.’
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘करमाळा तालुक्यात झोळ फाउंडेशनच्या शाखामार्फत नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे. रस्ते, पाणी, वीज या प्रश्नांच्यासाठी लढत राहून सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्यासाठी झोळ परिवाराची भूमिका आहे.
कांबळे म्हणाले, ‘करमाळा तालुक्याच्या येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीत किमान २० प्रतिनिधी दिसणार अशी आशा आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता नवीन वर्षामध्ये संकल्प करून गाव तिथे प्रा. रामदास झोळ सर यांचा परीवार मजबूत करण्यासाठी फाउंडेशनच्या शाखा काढण्यासाठी कामाला लागावे.’ प्रास्ताविक श्रीकांत साखरे यांनी केले. सूत्रसंचालन गोपीनाथ पाटील तर आभार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे गणेश मंगवडे यांनी मानले.