करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च फॉर गर्ल्स येथे 20 व 21 फेब्रुवारीला होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय परिषदेच्या’ माहितीपत्रकाचे प्रकाशन प्रा. रामदास झोळ यांच्या हस्ते झाले. यावेळी उपाध्यक्ष राणा सूर्यवंशी, सचिव माया झोळ, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. विशाल बाबर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. ज्योती जावळे, विभागप्रमुख डॉ. के. श्रीकांतकुमार, डॉ. हरीबा जेडगे, डॉ. डी. चीनाबाबू, डॉ. गायत्री ढोबळे, प्रा. अमित पोंदकुले, प्रा. दिक्षा शिंदे, प्रा. योगेश सातपुते उपस्थितीत होते. फार्मसी क्षेत्रातील अंतर्दृष्टी, नवकल्पना, उदयोन्मुख ट्रेंड, प्रगती, सर्वोत्तम पद्धती आणि आव्हाने सामायिक करण्यासाठी आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय नामांकित संस्थांमधून संसाधन व्यक्ती म्हणून प्रमुख तज्ञांद्वारे मार्गाद्दर्शन करण्यात येईल. हे जगभरातील विद्यार्थी, संशोधक, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांना खूप उपयुक्त ठरणार आहे. परिषदेमध्ये सहभागी विद्यार्थी, संशोधक, विद्वान, शिक्षणतज्ज्ञ याच्यासाठी मौखिक आणि पोस्टर सादरीकरणासाठी विशेष सत्र होणार आहेत.
https://forms.gle/gGVVdZkyS9yvLYRb9 या लिंकचा वापर करून इच्छुकांनी नोंदणी करावी. ईमेलद्वारे dattakalaconference2025@gmail.com व ९४९४६८२७३२, ९८९०१५१५०९, ७७७६००२९२९ या मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. बाबर यांनी केले.