करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात आज (मंगळवारी) सकाळपासून सर्वत्र शांततेत मतदान सुरु आहे. दुपारी १ वाजेपर्यंत २८.२९ टक्के मतदान झाले होते. उमरड येथे हयात असलेल्या १०० पेक्षा जास्त मतदारांच्यापुढे डिलिटचा शिक्का असल्याने मतदान करता आले नाही. यावर संताप व्यक्त करत बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांनी अपक्षेप घेतला. त्यामुळे साधारण अर्धातास मतदान प्रक्रिया बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी यामध्ये हस्तपक्षेप करत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मतदारांची समजूत काढून मतदान प्रक्रिया सुरळीत केली. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनीही घटनास्थळी भेट दिली.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याविरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात लढत होत आहे. या मतदारसंघात १ वाजेपर्यंत २६.६१ टक्के मतदान झाले होते. भाजपचे उमेदवार निंबाळकर यांनी मातोश्रींचे आशीर्वाद घेऊन निंबोरे येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. धैर्यशील मोहिते पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांच्या पत्नी शीतलदेवी मोहिते पाटील यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदान केंद्राला भेटी दिल्या आहेत.

पोथरे येथे दूपारी १ वाजेपर्यंत ३३३४ पैकी ११३० मतदान झाले आहे. बिटरगाव श्री येथे ७४३ पैकी २९७ मतदान झाले आहे. दत्तकाला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांनी वाशिंबे येथे मतदानाचा अधिकार बजावला. वीट मतदान केंद्रावर दुपारी १२ वाजेपर्यंत १२५० मतदान झाले होते. प्रभाग क्रमांक ३९ मध्ये मतदान प्रतीनिधी असलेले तेजस ढेरे म्हणाले येथे १५ मिनिटे मतदान प्रक्रिया थांबुन मशीनवरील शाई पुसुन नंतर मतदान सुरू करण्यात आले. एकाच चिन्हापुढे मदन करताना शाई लागली होती. त्यामुळे ही शाई पुसून पुन्हा मतदान प्रक्रिया सुरु करण्यात आली.

माढा लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत करमाळा विधानसभा मतदारसंघात २७.२१ टक्के, माढा विधानसभा मतदारसंघात २०.१९ टक्के, माळशिरस विधानसभा मतदारसंघात ३२.५४ टक्के, माण विधानसभा मतदारसंघात २२.७९ टक्के, फलठण विधानसभा मतदारसंघात २९.७७ टक्के तर सांगोला विधानसभा मतदारसंघात २७.३० टक्के मतदान झाले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *