A case has been registered against four persons for the type of conspiracy

करमाळा (सोलापूर) : दोन धर्मात तेढ निर्माण होईल, अशी पोस्ट केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांनी तत्काळ असे मेसेज करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असून अशा वादग्रस्त पोस्ट केल्यानंतर कोणालाही पाठीशी घातले जाणार नसून कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे. गुन्हा दाखल झालेल्यामध्ये एकजण पोस्ट करता आहे तर दुसरा संबंधित ग्रुपचा ऍडमीन आहे. या परकरानंतर करमाळ्यात अनेक ग्रुपवर ‘ओन्ली ऍडमिन’ सेटिंग करण्यात आली असल्याचे दिसत आहे.

करमाळ्यात सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टवर पोलिसांचे बारीक लक्ष आहे. यातच एका ग्रुपवर गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीने दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केली होती. संबंधित ग्रुपच्या ऍडमिनने याकडे दुर्लक्ष केले. संबंधित माहिती करमाळा पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली तेव्हा संबंधित ग्रुपच्या ऍडमिनने देखील ही पोस्ट डिलीट केली नाही. त्यामुळे हा कलम ५०५(२) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस नाईक चंद्रकांत ढवळे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.

दोन धर्मात तेढ निर्माण होईल अशी पोस्ट केल्याप्रकरणी करमाळा पोलिसात ऍडमिनसह दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *