श्री गिरधरदास देवी विद्यालयात दहावीच्या परीक्षेत समृद्धी साळवे प्रथम

करमाळा (सोलापूर) : येथील श्री गिरधरदास देवी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी दहावीच्या (SSC) परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे. विद्यालयामध्ये समृद्धी साळवे हिने 94.60 टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. द्वितीय क्रमांक समृद्धी अडसूळ हिने 93.20 टक्के, तृतीय क्रमांक सुप्रिया बरडे हिने 92 टक्के व चौथा क्रमांक सोमनाथ इरकर याने 87.40 टक्के तर प्रमिला पवार हिने 85.80 टक्के गुण मिळवून पाचवा क्रमांक मिळविला. विद्यालयाचा निकाल 93.2 टक्के लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री गिरधरदास देवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, संस्थेचे सचिव अमोद संचेती, संचालिका सुनीता देवी, चंद्रकांत देवी, विजयकुमार दोशी, मुख्याध्यापक संभाजी जगताप यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *