करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आणि कुंकसाठी प्रसिद्ध असलेल्या केम येथील वीज प्रश्नासाठी सर्व ग्रामस्थानी आज (मंगळवारी) एकत्र येत जेऊर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. या गावात 33/11 केव्हीच्या वीज उपकेंद्रासाठी स्वतंत्र व नवीन लाईन मंजूर झाली. मात्र काम पूर्ण न झाल्याने केम बंद ठेवत नगरिकानी जेऊर येथील महावितरण कार्यालयासमोर उपोषण केले. ‘आमच्या मागण्या मान्य करा’, ‘महावितरणचा निषेध’, असो अशी आंदोलकांच्यावतीने घोषणा देण्यात आल्या. या घोषणानी परिसर दणाणू गेला.
करमाळा तालुक्यातील केम कुंकूसाठी प्रसिद्ध आहे. मात्र येथे विजेचा प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे नगरिकानी गावात कडकडीत बंद ठेवत वीज उपकेंद्रासाठी स्वतंत्र व नवीन लाईन मंजूर आहे. मात्र काम पूर्ण न झाल्याने नगरिकानी संताप व्यक्त केला. गाव बंद ठेवत जेऊर येथे उपोषण करण्यात आले.