For the first time in the history of Karmala there will be a Talathi office at twenty places-

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या इतिहासात पहिल्यांदाच वीस ठिकाणी तलाठी कार्यालय होणार आहे. याशिवाय आठ ठिकाणी मंडळ अधिकारी होणार आहे. यासाठी ४ कोटी २० लाख निधी मंजूर झाला आहे. ही कार्यालये झाल्यानंतर महसुलशी संबंधित कामे गावातच होण्यास मदत होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नातून हा निधी उपलब्ध झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

वर्षानुवर्षे गावात तलाठी कार्यालय नसल्याने व तालुक्यासाठी अतिशय महत्त्वाचा विषय असलेल्या महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी आमदार शिंदे यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. ही कामे झाल्यानंतर नागरिकांना शहरांमध्ये हेलपाटे घालण्याची आवश्यकता राहणार नाही.

तालुक्यातील अपवाद सोडले तर प्रत्येक ग्रामपंचायतीला कार्यालय आहे. परंतु अनेक ठिकाणी तलाठी कार्यालय नाहीत. काही ठिकाणी कार्यालये आहेत ती मोडकळीला आलेली आहेत. काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या आश्रयाने उभी आहेत, ही अडचण लक्षात घेऊन सरकारने निधी उपलब्ध केला आहे. मजूर झालेल्या तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाखप्रमाणे निधी मंजूर झाला आहे.

तालुक्यातील करमाळा, जेऊर, केम, सालसे, अर्जुननगर, कोर्टी, केतुर व उमरड या ठिकाणी मंडळ अधिकारी कार्यालय होणार आहे. तर देवळाली, जातेगाव, वांगी, निंभोरे, गुळसडी, कंदर, घोटी, पांगरे, आवाटी, साडे, कोळगाव, करंजे, रावगाव, वीट, जिंती, हिंगणी, कात्रज, चिखलठाण, वाशिंबे व शेटफळ येथे तलाठी कार्यालय होणार आहे.

सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल म्हणाले, तालुक्यातील रस्ते, पाणी, वीज याबरोबरच दुर्लक्षित असलेल्या विषयांकडे आमदार शिंदे यांचे लक्ष आहे. चार वर्षात नवीन बांधकामासाठी जवळपास 100 कोटीपेक्षा अधिक निधी त्यांनी आणला आहे. डिकसळ पुलासाठी 55 कोटी, नगरपरिषद नवीन इमारत, सांस्कृतिक भवन व छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा यासाठी 10 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा श्रेणीवर्धनकरून 100 खाट रूपांतर 25 कोटी, उपजिल्हा रुग्णालय करमाळा अधिकारी व कर्मचारी वसाहतीसाठी 18 कोटी, सहाय्यक निबंधक कार्यालय बांधकामासाठी 1 कोटी 69 लाख, ग्रामपंचायत कार्यालय बांधकामासाठी 4 कोटी निधी उपलब्ध झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *