करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील आवाटी येथे सीना नदीतून बेकायदा वाळू उपसा करणारा एक ट्रॅक्टर पकडण्यात आला आहे. यामध्ये वाळू व ट्रॅक्टरसह १० लाख १० हजाराचा ऐवज जप्त करण्यात आला आहे, करमाळा पोलिसांनी आज पहाटे अडीच वाजता ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिस हेडकॉन्स्टेबल हवलदार अजित उबाळे, पोलिस कॉन्स्टेबल तोफीक रझाक काझी, पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिंदे, चंद्रकांत ढवळे, होमगार्ड श्री. शहाणे आदींनी ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिस कॉन्स्टेबल गणेश खोटे यांनी याप्रकरणात फिर्याद दिली आहे. यमध्ये सोहेल मुनेर पठाण (वय २३) व ताहेर जाफर खान अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. (बातमतीतील फोटो संग्रहीत आहे.)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *