करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. विठ्ठल विश्वनाथ लोकरे (वय ६०) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. यामध्ये पोलिस नाईक प्रमोद गवळी यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. संशयित आरोपीकडून १ हजार ५० रुपयांचे मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. कंदर एसटी स्टॅन्डजवळ मटका सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
कंदर येथे मटका घेणाऱ्या एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल
