करमाळा (अशोक मुरूमकर) : शिक्षकाने एका अल्पवयीन मुलाला वर्गात मारहाण करून जखमी केले असल्याचा प्रकार करमाळा तालुक्यात उघडकीस आला आहे. यामध्ये मुलाच्या पालकाने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित शिक्षकावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धनंजय मछिंद्र नागणे (रा. केम) असे गुन्हा दाखल झालेल्या सहशिक्षकाचे नाव आहे.
करमाळा तालुक्यातील एका शाळेत ते गणित शिकवतात. संबंधित शिक्षक शाळेत आले आणि त्यांनी फळ्यावर दोन ओळी लिहिल्या. दरम्यान ते विद्यार्थ्याकडे गेले तेव्हा संबंधित विद्यार्थी इंग्रजी विषयाची वही ठेऊन गणित विषयाची वही काढत होता. तेव्हा शिक्षकाने त्याच्या गालावर व पाठीवर मारहाण करून शिवीगाळ करत वर्गाच्या बाहेर काढले. तेव्हा त्याच्या कमरेला बेंच लागला. संबंधित विद्यार्थी पुन्हा वर्गात आला तेव्हा शिक्षकाने तू वर्गात कोणाला विचारून आला. असे विचारले तेव्हा मुख्याध्यपकांना विचारून आलो असल्याचे त्याने सांगितले. सायंकाळी विद्यार्थी घरी गेला तेव्हा तो रडत होता. त्यानंतर त्याने सर्व प्रकार वडिलांना सांगितला. त्याला निंभोरे येथील एका खासगी रुग्णालयात प्राथमिक उपचार केले आहेत. याचा पुढील तपास सुरु आहे. शेतात दिवसभर काम करून घरी असल्यानंतर मुलगा मोठमोठ्याने रडत असल्याचे दिसले. त्यानंतर त्याला विचारले तर त्याने वरील हकीगत सांगितली, असे पालकांनी फिर्यादीत म्हटले आहे.