Warning to protest against Karmala Municipality on Republic Day in Solapur

करमाळा : करमाळा नगरपालिकेच्या ठेकेदाराची चौकशी करा या मागणीसाठी २६ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयसमोर आमरण उपोषण करण्यात येणार आहे, असा इशारा करमाळा अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष फारुक जमादार यांनी दिला आहे. बांधकाम ठेकेदाराला दोन वर्षांपूर्वी वर्कऑर्डर देऊनही रस्त्याचे काम झाले नसून संबंधीत ठेकेदाराची चौकशी करण्याची मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

जमादार म्हणाले, संजय कुंभार ते कत्तलखाना रस्ता डांबरीकरण करणे या कामाची दोन वर्षांपूर्वी वर्कऑर्डर दिली होती. परंतु संबंधित ठेकेदाराने अद्यापपर्यंत काम केलेले नाही. मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार करूनही काम झालेले नाही त्यामुळे २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रशासनाला पत्र दिले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *