करमाळा (अशोक मुरूमकर) : पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या महाराजांच्या ड्रॉयव्हरला करमाळा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या संशयिताला न्यायालयासमोर हजर केल्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी आयपीएस अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली एका ‘निर्भया’च्या तक्रारीवरून नरधमावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. संशयित हा एका महाराजांच्या गाडीवर चालक असल्याचे समोर आले आहे. त्याने मोबाईलवर गेम दाखवतो म्हणून निर्भयाला व आणखी एकाला गाडीत नेले. त्यानंतर एकाला काहीतरी कारण सांगून गाडीतून खाली उरवले. त्यानंतर चिमुकल्या निर्भयाशी त्याने गैरकृत्य केले. दरम्यान निर्भयाने घाबरून त्याच्याकडून सुटका करून पळून गेली. त्यानंतर हा प्रकार लक्षात आल्याने त्यांनी पोलिसात तक्रार दिली.
आयपीएस अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तप्तरता दाखवत तत्काळ संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.
