Unidentified body found in Karmala bus stand areaCase filed against husband in Karmala police for inciting suicide

करमाळा (सोलापूर) : दारू पिऊन सतत मारहाण करून पत्नीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. करमाळा तालुक्यातील निंभोरे येथे २ तारखेला ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणात विवाहितचे वडील उल्हास शंकर लांडगे (वय ६४, रा. म्हसोबा रुई, ता. माढा) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून जावईविरुद्ध आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

विजया महावीर मारकड (वय 34, रा. निंभोरे, ता. करमाळा) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर महावीर साहेबराव मारकड असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. मारकड हा दारू पिऊन पत्नीला सतत मारहाण करत होता. त्याला सांगून देखील तो ऐकत नव्हता. दारूच्या नशेत तो मारहाण करत. मारहाण करत असताना सासू सोडवायला आल्यानंतर तिलाही तो मारहाण करत होता.

फिर्यादी लांडगे यांच्या बहिणीच्या मुलाच मुलगी दिली होती. बहिणीलाही (त्याच्या आईला) तो सतत मारहाण करत असल्याने तिलादेखील भावाकडे म्हणजे फिर्यादी उल्हास शंकर लांडगे यांच्याकडेच राहत होती. यामध्ये आत्महत्या केलेल्या मुलीला एक १२ वर्षाची मुलगी व १४ वर्षाचा मुलगा आहे. सोळा वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. आत्महत्या करण्यापूर्वीही एखादा पायावर मारहाण करून तिला जखमी केले होते.

त्यानंतर तिच्यावर पुण्यात उपचार घेतले होते. तेव्हापासून ती जीव देणार असल्याचे म्हणत होती. मात्र लेकरांकडे पाहून रहा, असे आम्ही म्हणत होतो. तुला नांदायचे आहे, समजून घेत जा, असे म्हणत होतो. मात्र तरीही तो दारू पिऊन मारहाण करत होता. त्यातूनच तिने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्यानंतर तिला करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र तिचा मृत्यू झाला. तेव्हा तिच्या पाठीवर लाल व्रणही होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *