Breaking गॅस कटरने करमाळ्यात बँकेचे एटीएम फोडले

A gas cutter broke a bank ATM in Karmala

करमाळा (सोलापूर) : येथील भवानीनाका परिसरात असलेल्या आयडीबीय बँकेचे एटीएम फोडले आहे. आज (शनिवारी) पहाटे चोरटयांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर स्प्रे मारून गॅस कटरच्या साह्याने एटीएम फोडून त्यातील सुमारे १४ लाखाची रक्कम लंपास केली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेची माहिती समजताच करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे हे घटनास्थळी दाखल झाले आहेत. बँकेचे अधिकारी व कर्मचारी देखील येथे दाखल झाले आहेत. याचा पुढील तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *