करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलिस कवायत मैदानावर काल (शुक्रवार) दोन गटात तुफान राडा झाला असल्याचा व्हिडीओ सोशय मीडियावर व्हायरल झाला आहे. याचे एका माध्यमाने वृत्तदेखील दिले असून पोलिस ठाण्याजवळच हा प्रकार घडला असल्याने याची करमाळा शहर व तालुक्यात जोरदार चर्चा सुरु आहे.
करमाळा तहसील कार्यालय परिसरात पंचायत समितीच्या समोर पोलिस कवायत मैदान आहे. या मैदानाच्या बाजूला तहसील कार्यालय, सेतू कार्यालय, पोलिस ठाणे आहे. याच मैदानावर काल दोन गटात जोरदार राडा झाला. मिळालेल्या माहितीनुसार राडा करणारे दोघेही एकाच गावातील आहेत. दोघांमध्ये बाचाबाची सुरु असताना याचे रूपांतर मारहाणीत झाले. त्यानंतर हा वाद मिठवण्यात आला. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये शिवीगाळ केली असून मारहाण केली असल्याचे दिसत आहे. पोलिसांकडून यांची माहिती घेण्याचे काम सुरु असून यामध्ये गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
