करमाळा (अशोक मुरुमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे आमचे कल्याण झाले आहे. ते जे सांगतील तेच आम्ही करणार आहोत, असे अश्वासन गुळसडीचे दत्तात्रय अडसुळ यांनी दिले आहे.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात आज (सोमवारी) आमदार शिंदे गटाच्या प्रमुख पदाधीकार्यांची बैठक झाली. यावेळी खासदार रणजिंतसिंह नाईक निंबाळकर व आमदार शिंदे उपस्थित होते. दोघांनीही पंचायत समितीच्या गणानिहाय पदाधीकार्यांकडून आढावा घेतला. या बैठकीच्या निमित्ताने आमदार शिंदे व खासदार निंबाळकर हे दोघे पहिल्यांदाच एकत्र दिसले. आमदार जयकुमार गोरे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, आमदार शिंदे गटाचे समर्थक सुजित बागल आदी उपस्थित होते.
आढावा बैठकीत कार्यकर्त्यांना निवडणुक प्रचाराच्यानिमीत्ताने मार्गदर्शन करण्यात आले. आडसुळ म्हणाले, दहिगाव उपसासिंचन योजना आमदार शिंदे यांच्यामुळे यशस्वीरित्या सुरु आहे. जेथे हुलगे पिकत नव्हते तेथे आता सोनं (केळी) पिकायला लागली आहे. संपूर्ण शेती ओलीताखाली आली आहे. आता आमदार शिंदे जे सांगतील तेच आम्ही करणार असे ते म्हणाले आहेत.
आढावा बैठकीपूर्वी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे स्वागत राष्ट्रवादीच्या वतीने (अजित पवार गट) बबनदादा मुरुमकर, बोरगावचे माजी सरपंच विनय ननवरे यांनी केले. भोजराज सुरवसे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, सुर्यकांत पाटील, डॉ. हरिदास केवारे, बिभीषण खरात, युवराज गपाट, अशिष गायकवाड, सुहास गलांडे आदी उपस्थित होते.