करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघात मंगळवारी (ता. ७) मतदान होणार असून प्रचारही सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. रविवारी (ता. ५) या प्रचाराची सांगता होणार आहे. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराची सांगता फलठण येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेने होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी व तालुका कोअर कमिटी सदस्यांची बैठक झाली आहे. यावेळी माढा लोकसभा क्षेत्रातील विजयाचा निर्धारही प्रसाद लाड यांनी व्यक्त केला आहे. यावेळी सुनील कर्जतकर, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यासह स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


