Donation of one lakh and eleven thousand from the devotees of Pune for Sri Kamaladevi temple

करमाळा (सोलापूर) : येथील श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टने श्री कमलादेवी मंदिर जतन व संवर्धनाचे काम सुरु केले आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे यांनी भक्तांकडे मदतीचे आवाहन केले होते. याला प्रतिसाद देत पुण्यातील (मूळ कर्माला) सचिन घाडगे यांनी धनादेशद्वारे १ लाख ११ हजार १११ देणगी दिली आहे. त्यामुळे त्यांचा मंदिर समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला आहे.

मंदिर समितीचे अध्यक्ष चिवटे, सचिव अनिल पाटील, विश्वस्त डॉ. प्रदीपकुमार जाधव पाटील, विश्वस्त डॉ. महेंद्र नगरे, विश्वस्त सुशील राठोड, विश्वस्त राजेंद्र वाशिंबेकर, विश्वस्त ॲड. शिरीषकुमार लोणकर, प्रशासनाधिकारी महादेव भोसले, व्यवस्थापक अशोक गाठे, मंदिर पुजारी, रोहित पुजारी, सचिन सोरटे, धनंजय सोरटे उपस्थित होते. या निमित्ताने श्रीकमलाभवानी मंदीर जीर्णोधारासाठी भाविकांनी सढळ हाताने मदत करण्याचे आवाहन ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. श्री कमलादेवी मंदिर समितीस देणगीदारांना ८०जी कलमान्वये आय करमधून सवलत मिळत आहे. तसेच ऑनलाइन देणगीची सुविधा उपलब्ध आहे. देणगीसाठी संपर्क अशोक गाठे : ९४०४७०८९२४

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *