करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील उमरड येथे रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीला दुचाकी (Mh13 q 4368) धडकली आहे. या अपघातात एकजण ठार तर दुसरा जखमी झाला असल्याचे सांगितले जात आहे. अपघाताची माहिती समजताच पोलिस पाटील अंकुश कोठावळे यांच्यासह तेथील नागरिक मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. अपघातातील जखमी हे केत्तूर येथील असल्याचे समजत आहे. जखमीला करमाळा येथे रुग्णालयात दाखल केले जात आहे. ट्रॉलीमध्ये बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केली होती. दरम्यान दुचाकीवरील दोघेजण उमरडकडून केत्तूरकडे जात होते. तेव्हा त्यांची धडक ट्रॉलीला झाली. त्यात एकजण ठार तर एकजण जखमी झाला अशी प्राथमिक माहिती दिली जात आहे.
Breaking उमरडजवळ रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला दुचाकीची धडक
