करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथील माजी आमदार नारायण पाटील गटाचे कार्यकर्ते धुळाजी कोकरे, कैलास कोकरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी बागल गटात प्रवेश केला आहे. बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब पांढरे, सतिष नीळ, रेवन्नाथ निकत, गणेश झोळ, बापू चोरमले, संतोष पाटील, प्रवीण सरडे, आशिष गायकवाड, अजित झांजूर्ने, रामभाऊ हाके, साधना खरात, आबा करगळ, काशीनाथ काकडे, देवा ढेरे आदी यावेळी उपस्थित होते.

करमाळा तालुक्यातील गावपातळीवरील अनेक नेते मंडळी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर बागल गटात प्रवेश करणार असल्याचे माहिती नीळ यांनी यावेळी संगितले. बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल व नेते दिग्विजय बागल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत करमाळा तालुक्यातील मातब्बर मंडळी बागल गटात प्रवेश करणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.