लिंबेवाडीचे सरपंच फुंदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

Adarsh ​​Sarpanch Award announced to Sarpanch Kiran Funde of Limbewadi

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच किरण फुंदे यांना पुण्यातील नालंदा ऑर्गनायजेशनचा आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार असून करमाळा तालुक्यातून त्यांना जाहीर झाला आहे. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याचे वितरण होणार आहे. या निवडीचे पत्र त्यांना प्राप्त झाले आहे.

सरपंच फुंदे म्हणाले, ‘आमदार संजयमामा शिंदे यांनी विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मला हा पुरस्कार प्राप्त झाला. याचे सर्व श्रेय गावकऱ्यांचे आहे. त्यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि काम करता आले. नालंदा ऑर्गनायजेशननेसर्व्हेक्षण करून हा पुरस्कार जाहीर केला आहे. ग्रामसमृध्दीमुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. विकास काम करण्यासाठी फक्त कल्पना असून चालत नाही तर त्या कामासाठी आवश्यक तो निधीही उपलब्ध व्हावा लागतो. गावचा विकास करण्यासाठी गावकऱ्यांनी मला सरपंच केले त्यांच्या विश्वासास पात्र राहून मी काम केले. आमदार शिंदे यांनी दिलेल्या निधीमुळे मला हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. गावात सामान्य नागरिक केंद्र मानून कामे केली आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन काम करत राहिलो. या पुरस्काराने आणखी काम करण्याची ऊर्जा मिळाली आहे, असेही ते म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *