Inauguration of Shelgaon to Dhokri road by Habhap Rambhau Maharaj Nimbalkar

करमाळा (सोलापूर) : वांगी परिसरातील उजनी धरणामुळे पुनर्वसित 10 गावांसाठी दळणवळणासाठी महत्वाच्या शेलगाव (वां) ते ढोकरी या 14 किलोमीटरच्या रस्त्याच्या विशेष दुरुस्तीअंतर्गत कामाचा शुभारंभ हभप रामभाऊ महाराज निंबाळकर यांच्या हस्ते आरकिले वस्ती येथे झाला.

शेलगाव वा ते ढोकरी या रस्त्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने अनेक वर्ष संघर्ष केला. रास्ता रोको, उपोषणे या माध्यमातून आवाज उठवला. अखेर याची दखल घेत तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री विजयसिंह मोहिते पाटील, तत्कालीन आमदार शामलताई बागल यांच्या शिफारशीनुसार पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर करण्यात आले होते. दहा बारा वर्षानंतर अनेक ठिकाणी हा रस्ता खराब झाला होता. अनेक ठिकाणी रस्ता उखडून खड्डे पडले होते. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत होता.

वांगी परिसरातील रस्ते, पाणी, वीज यांच्या बाबतीत निर्माण होणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत असलेल्या रस्ता संघर्ष समितीने पुढाकार घेऊन पंतप्रधान ग्रामसडक योजनेंच्या कार्यलयाशी सततचा संपर्क ठेवून विशेष दुरुस्ती अंतर्गत निधी मिळवण्याचा प्रयत्न केला. या कार्यालयाचे उपअभियंता विलास ढेरे, कनिष्ठ अभियंता भिलारे यांच्या मार्फत निधी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला होता. पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या सोलापूर येथील कार्यालयाशी रस्ता संघर्ष समितीचे प्रमुख पदाधिकारी प्रा. शिवाजी बंडगर, शहाजीराव देशमुख, महेंद्र पाटील, भारत साळुंके, विठ्ठल शेळके, अर्जुन तकीक आदिनी सततचा पाठपुरावा ठेवत या कामासाठी 2 कोटी 65 लाख रुपये मंजूर करून घेतले.

कामाच्या उदघाटनप्रसंगी आदिनाथचे माजी उपाध्यक्ष शहाजीराव देशमुख, बाजार समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजी बंडगर, माजी संचालक भारत साळुंके, पांडुरंग जाधव, केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष महेंद्र पाटील, वांगीचे माजी सरपंच विठ्ठल शेळके, केळी उत्पादक संघाचे सचिव अर्जुन तकीक, आदिनाथचे प्रशासकीय संचालक दीपक देशमुख, वांगी सोसायटीचे संचालक विकास पाटील, नागनाथ मंगवडे, रामेश्वर तळेकर, रामभाऊ सूळ, डाॅ. भाऊसाहेब शेळके, अनिल वळसे, अमर आरकिले, अनिल आरकिले, शिवाजी खरात, शंकर खरात, भारत सलगर, महादेव वाघमोडे, पांडुरंग गडदे, शंकर सांगवे, बाबासाहेब बोरकर, बाबासाहेब चौगुले, महादेव बंडगर, आदित्य बंडगर, तात्यासाहेब सरडे, दादासाहेब भोसले, महादेव नलवडे, आबा सरडे, विठ्ठल सरडे, वैभव पाटील, गणेश पाटील, सुधीर देशमुख, संजय आरकिले, उत्तम धनवे, मामा मांढरे, आगतराव मांढरे, धनसिंह शेटे, प्रकाश पाटील, बाळू आरकिले, काकासाहेब बोरकर, रेवा महाडीक, शिवाजी कांबळे, दत्तू सरडे उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *