Vinod Ghuge took charge of Karmala Police Station

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पोलिस ठाण्याचा विनोद घुगे यांनी आज (बुधवारी) पोलिस निरीक्षक म्हणून पदभार घेतला आहे. पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे बदली झालेले ज्योतीराम गुंजवटे यांनी त्यांचे स्वागत करून नूतन पोलिस निरीक्षक घुगे यांच्याकडे पदभार दिला आहे. यावेळी घुगे यांनीही गुंजवटे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या आहेत
करमाळ्याचे नवीन पीआय घुगे! गुंजवटे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या आदेशाने जिल्ह्यातील १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यामध्ये करमाळा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गुंजवटे यांचीही बदली झाली असून त्यांच्या जागी नियंत्रण कक्षाचे विनोद घुगे हे पोलिस निरीक्षक म्हणून आले आहेत. तर गुंजवटे यांची बदली पंढरपूर मंदिर सुरक्षा येथे झाली आहे.

गुंजवटे हे २० ऑक्टोबर २०२२ ला करमाळ्यात आले होते. गणेशोत्सवाच्या तोंडावरच त्यांची बदली करमाळा येथे झाली होती. कायदा सुव्यवस्था आबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केला. सुभाष चौक नामांतरणाचा संवेदनशीला विषय, मकाई सहकारी साखर कारखान्याचा थकीत ऊस बिलाचा प्रश्न व युवा सेनेचे शंभूराजे फरतडे यांनी ऊस वाहतूकदारांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे आंदोलन त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले. (मकाईचे आंदोलन अजूनही सुरूच आहे.)

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *