Agricultural implement bank launched under UMED in Nimbhore

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत राणी लक्ष्मी महिला ग्रामसंघ कृषी अवजार बँक लोकार्पण सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी मनोज राऊत, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच रविंद्र वळेकर होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून तालुका अभियान व्यवस्थापक योगेश जगताप उपस्थित होते.

बचत गटातील महिलांनी शेतीकडे एक व्यवसाय म्हणून पहावे. तसेच नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्कृष्ट शेती करून आपली आर्थिक उन्नती करावी, असे आवाहन राऊत यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत अवजार बँक लोकार्पण सोहळ्यात पुढे बोलताना राऊत यांनी महिलांना फक्त गृहिणी म्हणून न राहता मिळालेल्या कर्जातून वेगवेगळे व्यवसाय निर्माण करून उद्योजक व्हावे. तसेच विविध प्रकारचे प्रशिक्षण घेऊन सेंद्रिय शेती, गट शेती करून आपली प्रगती करावी तसेच महिलांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन राऊत यांनी केले.

तालुका अभियान व्यवस्थापक जगताप साहेब यांनी अवजार बँकेचे महत्व सांगून ग्रामसंघाने योग्य नियोजन करून आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावे तसेच वेळेत परतफेड करणे, योग्य ते रजिस्टर अद्यावत ठेवणेबाबत मार्गदर्शन केले. महिलांनी अवजार बँकचा लाभ घेऊन प्रगती करावी, असे आवाहन केले. प्रभाग समन्वयक आकाश पवार, प्रशांत मस्तुद, ग्रामसंघाचे पदाधिकारी, लिपिका, CRP मंजुश्री मुळे, सुषमा वाघमारे व समूहातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप मूळे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन हनुमंत पवार यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *