करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अजित जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. अंकुश शिंदे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त जागेवर निवड करण्यासाठी वाडगाव ग्रामपंचायतीमध्ये आज (बुधवारी) सरपंच बळीराम काळे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसेवक प्रदीप मोकाशी यांनी सदस्यांची विशेष बैठक बोलावली होती. त्यामध्ये ही निवड झाली आहे.
निवडीनंतर जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मकाईचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर, सीए लहू काळे, संभाजी भांडवलकर, ग्रामपंचायत सदस्या मंजुळा थोरात, जनाबाई अंधारे, सविता रोडगे, चंद्रकांत काळे, विजय रोडगे, ईश्वर भांडवलकर, इब्राहिम पठाण, नामदेव रोडगे, बशीर पठाण, पांडुरंग भांडवलकर, संदीप जगदाळे, जावेद पठाण, गणेश अंधारे, सतीश अनपट, रमेश जोशी, हेमंत रोडगे, जालिंदर रोडगे, शहाजी रोडगे, नवनाथ वाडेकर आदी उपस्थित होते.