करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराजवळ आज (शुक्रवारी) रात्री आकरा वाजताच्या सुमारास झालेल्या मोठ्या आवाजाने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान कमलाई कारखान्यात बिघाड झाल्याने (स्ट्रीम ऐअर फ्रेशर लिकेज झाल्याने) हा आवाज झाला आहे. यामुळे कोणीही घाबरुन जाऊ नये, असे आवाहन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी केले आहे. यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही.
आवाजाची माहिती समजताच सर्वत्र घबराट निर्माण झाला. पोलिस निरीक्षक घुगे यांनी तत्काळ याची माहिती घेतली आहे.
करमाळा शहर परीसरात झालेल्या या आवाजाने नागरीक भयभीत झाले व सर्वांना आवाजाचे कुतुहल निर्माण झाले. दरम्यान कारखान्यातील बिघाडामुळे हा आवाज आला असल्याचे कारखाना प्रशासन व पोलिस निरीक्षक घुगे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.