करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथे आज (शनिवारी) मध्यरात्री साडेबारा ते पहाटे दोन वाजताच्या दरम्यान दोन ठिकाणी चोरीचा प्रयत्न झाला आहे. मात्र घरात काहीच न सापडल्याने हा प्रयत्न फसला आहे. बाळेवाडीत शेंद्रे वस्ती येथे रात्री हा प्रकार घडला आहे. शेंद्रे हे घराच्या दरवाज्याला कुलूप लाऊन शेतात दार्यावर गेले होते. दोन वाजताच्या दरम्यान ते घरी आले तेव्हा घराचे कुलूप तोडलेले दिसले. त्यानंतर त्यांनी घरात पाहिले तेव्हा कपाटातील कपडे अस्थावेस्थ झालेली दिसली. मात्र त्यांच्या हाती काहीच लागले नाही. रमेश पाटील व जेजरथ शेंद्रे यांच्याघरी चोरांकडून हा चोरीचा प्रयत्न झाला. रमेश पाटील व जेजरथ शेंद्रे हे रात्री दाऱ्यावर गेले असताना त्यांच्या घरी येऊन चोरट्यांनी कुलूपाचा कोयंडा कट केला व घरातील कपटामधील सर्व साहित्य बाहेर टाकले. ही माहिती समजताच संपूर्ण बाळेवाडीमध्ये रात्रभर भीतीचे वातावरण पसरले होते.

