करमाळा (सोलापूर) : शाहूनगर येथील शिंदे हॉस्पिटलच्या वर्धापनदिनानिमित्त (15 ऑगस्ट) मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिर झाले. एमजीएम मेडिकल कॉलेज, संभाजीनगर (औरंगाबाद) येथील सर्जन व पोटाचे विकार तज्ञ डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन झाले. शिंदे हॉस्पिटलमध्ये मर्यादित कालावधीकरिता बी. एम. डी. यूरिक ॲसिड तपासणी मोफत करण्यात आल्या असून हाडांच्या ऑपरेशनमध्ये 40 टक्के सवलत देण्यात आली आहे.
इंडोस्कॉपी, अंगावरील लहान गाठ काढणे, हर्निया, हायड्रोसिल, मुळव्याध, अपेंडिक्स, भगेंद्र, मुतखडा इ. तपासण्या पोटाचे विकार तज्ञ डॉ. प्रफुल्ल पवार यांनी तपासणी केली. डॉ. दयानंद शिंदे, डॉ. चेतना शिंदे, डॉ. प्रफुल्ल पवार यांच्या माध्यमातून शिबिरामध्ये एकूण 390 मोफत तपासण्या करण्यात आल्या. यावेळी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले ‘रुग्णाच्या आजाराचे योग्य उपचार करून त्यांना रोगमुक्त करणे हे आमचे कर्तव्य आहे त्याचबरोबर पेशंटच्या सोयीसाठी शिंदे हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी पेशंटसाठी (महाराष्ट्र शासन) उपलब्ध आहे”
15 ऑगस्टला हॉस्पिटलच्या प्रांगणात ध्वजारोहण केले गेले. त्याचबरोबर हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त लोकांच्या हितासाठी मोफत सर्व रोग निदान शिबिर घेतले जातील, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिंदे हॉस्पिटल मधील सर्व नर्स स्टाफ वार्डबॉय ओ.टी असिस्टंट लॅब मेडिकल या सर्व कर्मचाऱ्यांचे या शिबिराला सहकार्य लाभले.