करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील खडकेवाडी येथे जागेला कंपाऊंड मारण्याच्या कारणावरून मारहाण केल्यापकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अशोक तात्याबा गाडे (वय ४२, रा. कुगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. गणेश जांबू माने (रा. खडकेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. फिर्यादी गाडे यांनी २० वर्ष कराराने खडकेवाडी येथे दूध व्यवसायासाठी ३६ गुंठे जागा भाडे कराराने घेतली आहे. त्या जागेला कंपाऊंड करण्याचे काम सुरु असताना फिर्यादी गाडे यांना गुन्हा दाखल झालेले माने यांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. १५ तारखेला सकाळी ९ वाजता हा वाद झाला आहे.
