करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठ येथील श्रीराम मंदीरास युवा सेनेचे प्रफुल्ल शिंदे यांनी श्रीराम मंदीर नावाचा एलईडी बोर्ड अर्पण केला आहे. वेताळ पेठ येथील श्रीराम मंदीराचे नुकतेच जिर्णाध्दार केला आहे. या मंदीराचे बांधकाम, अंतर्गत व बाह्य कामकाज हे अत्यंत कलाकुसरीने बनविले असून त्यामुळे मंदीराच्या बाहेरील बाजूस आणखीन शोभा आली आहे. हा संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.
यावेळी शिंदे म्हणाले, आपला धर्म, आपली संस्कृती जोपासली पाहिजे. याकरिता मी सर्व मंदीरांना करणार आहे. यापूर्वीही किल्ला वेस येथील हनुमान मंदीरास जय हनुमान नावाचा एलईडी बोर्ड व आंबीजळगाव येथील दत्त मंदीरास जय गुरूदेव दत्त असा एलईडी बोर्ड दिला आहे.
युवा सेनेचे शहर प्रमुख विशाल गायकवाड, युवा सेना उपतालुका प्रमुख दादासाहेब तनपुरे, उपतालुका प्रमुख खंडू जगताप, उपतालुका प्रमुख चक्रधर पाडुळे, टायगर ग्रुपचे बबलू पठाण, उद्योजक आकाश सिंधी, गजानन राक्षे, दर्शन कुलकर्णी, मनोज कुलकर्णी, विजय देशपांडे, सुधीर सावरे, महेश परदेशी, रवी नाईक, सिकंदर फकीर, संजय वीर, प्रशांत शिंदे, करण काळे, सुर्यपुजारी, रूपेश वनारसे, चैतन्य पाटील आदी रामभक्त उपस्थित होते.