सोलापूर : पंढरपुर ते टेंभुर्णी रोडवर आर्यन (बाल कल्याण समिती यांनी ठेवलेले नाव) हा बेवारस सापडला आहे. करकंब पोलिस ठाणे, सोलापुर यांचे मार्फत बाल कल्याण समिती सोलापूर यांचे आदेशाने 27 मे 2023 रोजी पाखर संकुल बालगृह सोलापुर या संस्थेत दाखल करण्यात आले आहे. तसेच प्रार्थना संदीप यादव उर्फ नित्या ही बालिका चिंचोली एमआयडीसी (ता. मोहोळ) या परिसरात विनापालक सापडली असुन मोहोळ पोलिस स्टेशन यांचेमार्फत बाल कल्याण समिती सोलापुर यांचे आदेशाने 1 एप्रिल 2023 रोजी पाखर संकुल बालगृह सोलापुर या संस्थेत दाखल करण्यात आले असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सोलापूर यांनी पत्रकान्वये कळविले आहे.
तरी बाळाच्या पालकांना व नातेवाईकांना आवाहन करण्यात येते की, ही माहिती प्रसिद्ध झालेपासुन 30 दिवसाच्या आत पाखर संकुल बालगृह, लुंबीनी बंगला, आसरा ब्रिज जवळ, 54 वामन नगर, जुळे सोलापुर 413004 किंवा जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे संपर्क क्र. 7219104503 किंवा बाल कल्याण समिती, जिल्हा परिवीक्षा अनुरक्षण संघटना संचलित निरीक्षणगृह/बालगृह, 937/9,नार्थ सदर बझार,सोलापूर यांचेशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आलेले आहे.