Karmala taluka will have water cut for 14 days from 1 March

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ११ गावांना पिण्यासाठी कुकडीतून पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला असून १ मार्चपासून हे आवर्तन सुरु होणार असल्याचे आमदार संजयमामा शिंदे यांनी ‘काय सांगता‘ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवारी) पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. कुकडी संयुक्त प्रकल्प उन्हाळी हंगामी २०२३- २४ च्या नियोजनाबाबत झालेल्या या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार संजयमामा शिंदे, कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, आमदार राम शिंदे यांच्यासह कुकडी संयुक्त प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, करमाळा तालुक्यात टंचाईचा सामना होऊ नये म्हणून प्रयत्न केले जात आहेत. कुकडी लाभक्षेत्रातील गावांना कुकडीचे पाणी मिळावे यासाठी उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत कालवा सल्लागार समितीचे सचिव यांनाही पत्रव्यहावर केला होता. त्यानुसार कुंभारगाव, कोर्टी, मोरवड, वंजारवाडी, रावगाव, कुस्करवाडी, विहाळ, पोन्धवडी, अंजनडोह, वीट, पिंपळवाडी, जातेगाव, कामोणे व राजुरीला दुष्काळामुळे कुकडीतून पिण्यासाठी पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी केली होती. त्यानुसार पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात कालवा सल्लागार समितीची बैठक

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *