करमाळा (सोलापूर) : मला आतापर्यंत तीन मोठ्या पक्षाचे फोन आले असून आमच्याकडून तुम्ही निवडणुक लढवावी, अशी अॉफर आली आहे. मात्र मी आता कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसून मी स्वतंत्र विचारसरणीने विधानसभा लढवणार आहे, असे माजी कुलकुरु अरुण अढसुळ यांनी सांगितले आहे. माजी कुलगुरु अरुण आडसुळ यांनी पत्रकार परिषदेत हे सांगितले आहे.
आडसुळ म्हणाले, सध्या सरकारबद्दल तरुणांच्या मनात असंतोष आहे. बेरोजगारी वाढत आहे. तरुणांसाठी व समाजासाठी मला काम करायचे आहे. मी सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनही घेतलेली नाही. करमाळा तालुक्यात शैक्षणिक सुविधा नाहीत, त्यावर मी भर देणार आहे. करमाळ्यात व्यवसायिक शिक्षण संस्था सुरु होणे आवश्यक आहे. येथे दोन संगणक कॉलेज सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. मी भिंती रंगवण्याच्या भानगडीत पडणार नसून मला काम करायचे आहे.
पुढे बोलताना आडसुळ म्हणाले, मी करमाळा येथीलच आहे. निवडणुकीत पराभव झाला तरी मला काही वाटणार नाही मात्र निवडणुक लढवणार हे निश्चीत आहे. विधानसभा निवडणुक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. (पत्रकार परिषद सुरु आहे, सविस्तर बातमी काही वेळातच)