पोथरेतील आशिष पठाडे ‘कुस्ती’मध्ये तालुक्यात प्रथम

Ashish Pathade first in Kusti in Pothre

करमाळा : शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पोथरे येथील आर. जी. गाडेकर विद्यालयाचा विद्यार्थी आशिष पठाडे याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सरपंच धनंजय झिंजाडे, पैलवान आयुब शेख, पै. वामन पठाडे यांनी विशेष अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षण विभागामार्फत भारत हायस्कूल जेऊर येथे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन उपमहाराष्ट्र केसरी पै. अतुल पाटील व पै. पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. सात वजनी गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत 37 किलो वजन गटात पठाडे याने तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या स्पर्धेत पंच म्हणून अनिल पाटील यांनी काम पाहिले. पठाडे यांच्या निवडीनंतर ग्रामस्थांच्या वतीने फेटा बांधून सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *