Fifteen thousand activists along with a convoy of one thousand cars from the district will go to Pune on the occasion of the anniversaryFifteen thousand activists along with a convoy of one thousand cars from the district will go to Pune on the occasion of the anniversary

करमाळा : येथे राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित आढावा बैठक आज शासकीय विश्रामगृह येथे पार पडली. यावेळी पक्ष वाढीसाठी आणि येणाऱ्या सर्व स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यासंदर्भात विचार विनिमय करून नुतन पदाधिकारी परिचय व निवडी संदर्भात चर्चा करून विविध आघाड्यांच्या निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्ष माढा लोकसभा संपर्कप्रमुखपदी भैरवनाथ सलगर, करमाळा तालुका प्रभारी नामदेव पालवे, तालुका उपाध्यक्ष डॉ. गणेश हाके, तालुका उपाध्यक्ष रावसाहेब बिनवडे, तालुका कार्याध्यक्ष शिवाजी नलावडे, तालुका संघटक काकासाहेब शिंदे, पदवीधर तालुकाध्यक्ष संभाजी पालवे, अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष जहाॅंगीर पठाण, युवा कार्याध्यक्ष विजय शिंदे, तालुका संपर्कप्रमुख विकास मेरगळ, केम शहरध्यक्षपदी सुरज धोत्रे इत्यादींच्या निवडी करण्यात आल्या.

या बैठकीस राष्ट्रीय समाज पक्षाचे जिल्हा अध्यक्ष रणंजित सुळ, संपर्कप्रमुख गोरख वाकडे, जिल्हा सरचिटणीस अंगद देवकते, माढा लोकसभा उपाध्यक्ष माळाप्पा खांडेकर, युवक जिल्हाध्यक्ष दामाजी मिटकरी, बहुजन संघर्ष सेनेचे अध्यक्ष राजाभाऊ कदम, बाळासाहेब टकले यांनी देखील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी रासपचे जिल्हा अध्यक्ष सुळ म्हणाले, देशातील सर्व बहुजन समाजाला सोबत घेऊन माजी मंत्री महादेव जानकर यांचे नेतृत्व सक्षम होत चालले आहे. रासप हा कष्टकरी, शेतकरी, वंचित, पिडीत घटकांतील बहुजनांचा पक्ष आहे. या पक्षात युवकांनी जास्तीत जास्त सामिल व्हावे. पक्षाचे महाराष्ट्रासह अन्य चार राज्यात जोरदार काम सुरू आहे. येणारा काळ रासपसाठी अतिशय चांगला आसेल. त्यामुळे तालुक्यातील सर्व आघाड्या पूर्ण करून वन बुथ टैंन युथची बांधणी व गाव तिथे कार्यकर्ता आणि शाखा काढाव्यात. त्याचबरोबर पुणे येथे पक्षाच्या २९ऑगस्टला वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्यातून एक हजार गाड्यांच्या ताफ्यासह इंदापूर, बारामती, पूरंदर, खडकवासला, भागातून पुणे, स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे जिल्ह्यातून १५ हजार कार्यकर्ते जाणारा आहेत. त्यामुळे तालुक्यातून आपणही जास्तीत जास्त संख्येने पुणे येथील मेळाव्यास उपस्थितीत राहाण्याचे आव्हान सुळ यांनी केले आहे.

यावेळी माढा बंडु शिंदे, कुर्डूवाडी शहराध्यक्ष सोमनाथ देवकते, उमरडचे माजी सरपंच संदीप मारकड, सुहास ओहळ, मिरगव्हणचे सरपंच संतोष लावंड, पत्रकार प्रवीण मखरे, भैरवनाथ सलगर यांची प्रमुख उपस्थिती होती. या आढावा बैठकीस योगेश पालवे, राजेंद्र जाधव, संभाजी पालवे, विकास मेरगळ, जहांगीर पठाण, बंडू शिंदे, संदीप मारकड, प्रवीण मखरे, सुरज धोत्रे, सुधीर ठोंबरे, सचिन काकडे, विलास शिंदे, कामोणे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर खरात, मच्छिंद्र हाके, हनुमंत नाळे, डॉ. गणेश हाके, नामदेव पालवे, धनंजय काळे, माऊली खरात, विलास मारकड, रावसाहेब बिनवडे, शंकर सुळ, शंकर राऊत, जगन्नाथ सलगर आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष जीवन होगले यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. यावेळी प्रस्ताविक अंगद देवकते यांनी तर आभार भैरु सलगर यांनी मांडले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *