Attention to Manoj Jarange role in the meeting at Divegvan on Saturday

केत्तूर (अभय माने) : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची दिवेगव्हाण (ता. करमाळा) येथे सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी (ता. 23) सायंकाळी ४ वाजता सभा होणार आहे. दिवेगव्हाण येथील नव्यानेच बांधलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळील सुमारे 70 एकर क्षेत्रावर या सभेचे आयोजन करण्यात आले असून, सभेसाठी मैदान तयार करण्याची जोरदार तयारी सुरू आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत असल्याने यावेळी म्हणून जरांगे पाटील काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात प्रथमच एवढी मोठी सभा होत असल्याने सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली आहे. जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळाले परंतु, सगे सोयऱ्यांचा अध्यादेशास आद्यपही कायदेशीर मंजुरी मिळालेली नाही. सगेसोयरे अध्यादेशाला कायदेशीर मंजुरी मिळावी अशी आग्रही मागणी मराठा समाजाकडून केली जात आहे. यापूर्वी तालुक्यातील उजनी लाभक्षेत्रातील वांगी येथे पहाटे चारच्या सुमारास जरांगे पाटील यांची भव्य सभा झाली होती.या सभेसाठी तालुक्यातील सकल मराठा समाजाने मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन दिवेगव्हाण आयोजकांनी केले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *